इस्तंबूल
इस्तंबूल : कॉन्स्टँटिनोपल. तुर्कस्तानचे सर्वांत मोठे शहर आणि महत्वाचे बंदर. लोकसंख्या २३,१२,७५१ (१९७०). काळा समुद्र आणि मार्मारा समुद्र यांना जोडणाऱ्या बॉस्पोरसच्या सामुद्रधुनीने यूरोप आशियापासून विभक्त झाला आहे;परंतु इस्तंबूल सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंस पसरल्याने त्याची दोन्ही खंडांत गणना होते.